आपल्याला नेहमीच सावध रहावे लागणार आहे, कारण लस १०० टक्के लोकसंख्येवर काम करतेच असेही नाही!
सध्या करोना संसर्गाचा प्रादुर्भाव भारतात कमी झाल्यासारखा वाटत असला तरी तो संपलेला नाही आणि परत येईल का याची भीती आहेच. त्यावर लस शोधण्यासाठी अनेक राष्ट्रांत चढाओढ आणि प्रयत्न चालू आहेत. चढाओढीतील प्रत्येक स्पर्धकाला वाटते की, आपली लस प्रथम बाजारात यावी आणि श्रेय प्रथम आपल्याला मिळावे. आपण विश्वास ठेवून आहोत की, लस आली तर आपण ‘कोविड-१९’वर मात करू, आणि मग आपल्याला पूर्णपणे समाधान मिळेल.......